मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

टॅग

शहर

४५ नोंदी

  • · ब्लॉग
    शहरनोंदी · १०

    शहरनोंदी १०

    शहरांच्या वेगात मोठी भूमिका त्यांतल्या दळणवळणाच्या साधनांची असते. वेग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त गोळीच्या वेगानं सणाणत निघालेल्या बुलेट ट्रेनचं चित्रच काय ते येतं. पण दळणवळणाच्या साधनांचा वेग शहरांच्या वेगासाठी तितका महत्त्वाचा नसतोच. गोंधळलात ना?! एक मिनिट! पण खरंच. बस…

  • · ब्लॉग
    शहरनोंदी · ९

    शहरनोंदी ०९

    ‘नेटफ्लिक्स’चा सी०ई०ओ० रीड हास्टिंग्स म्हणाला होता, माझी स्पर्धा माणसांच्या झोपेशी आहे. तशी शहरांची स्पर्धा माणसांच्या झोपेशी, स्वास्थ्याशी, निवांतपणाशी असते असं म्हटलं तर ते फारसं खोटं ठरणार नाही. शहरं अहर्निश धावत असतात. का बरं? साधं गणित आहे. एका विशिष्ट कालावकाशात एकूण किती…

  • · ब्लॉग
    शहरनोंदी · ८

    शहरनोंदी ०८

    ‘आपले’ लोक शेजारी असावेत, अशा मानवी प्रवृत्तीपायी जरी शहरात गेट्टोआयजेशन होत असलं, तरी ते सकारात्मकही नाही आणि शहराच्या चलनवलनाला मानवणारंही नाही. गेट्टोआयजेशन या शब्दाचा इतिहास काळाकुट्ट आहे. हिटलरच्या राजवटीत त्यानं ज्यू लोकांना विशिष्ट वस्त्यांच्या कुंपणाआत कोंबून तिथेच…

  • · ब्लॉग
    शहरनोंदी · ७

    शहरनोंदी ०७

    शहरांच्या आकर्षणामध्ये त्यांतल्या सोयी जितकी कळीची भूमिका निभावतात, तितकंच तिथलं स्वातंत्र्यही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘शहरांकडे चला’ हा संदेश तेच सांगतो. शहरांची रचना, यंत्रणा, किंबहुना त्यांची सगळी चालचलणूकच अशी असते; की जातिभेद पाळणं अशक्यच व्हावं. मेट्रो-लोकल…

  • · ब्लॉग
    शहरनोंदी · ६

    शहरनोंदी ०६

    “तुम्हां पुण्या-मुंबईकडच्या लोकांचं काय बाबा!” अशी किंचित असूयायुक्त अप्रूपाची एक झाक महाशहरांच्या बाहेरच्या लोकांच्या शहरवासीयांबद्दलच्या बोलण्यात असते. त्या असूयेचं मूळ कशात असतं? तर ते सुरळीत आणि सुसज्ज अशा यंत्रणांची कायमस्वरूपी उपलब्धता गृहीत धरता येणं, या महाशहरांच्या…

  • · ब्लॉग
    शहरनोंदी · ५

    शहरनोंदी ०५

    एफ०एस०आय० हा शहरांमधला एक परवलीचा शब्द. एखाद्या जागेचं क्षेत्रफळ आणि त्यावर करता येणारं बांधकाम यांच्यातलं ते गुणोत्तर. वरकरणी साधंसरळ गणित. पण माणसांच्या मानानं जागा मर्यादित असल्यामुळे शहरांमध्ये त्या गणिताला अनन्यसाधारण महत्त्व येतं. राहणारी आणि बांधणारी अशी दोन्ही प्रकारची…

  • · ब्लॉग
    शहरनोंदी · ४

    शहरनोंदी ०४

    गर्दी ही तशी सब्जेक्टिव गोष्ट असते. बेल्जियममधून दिल्लीत प्रथमच उतरलेल्या माणसाला ’सगळा बेल्जियमच अवतरलाय की काय या विमानतळावर?’ असं वाटून भीती वाटू शकते, मग तो बेल्जियमच्या राजधानीत का राहणारा असेना. पण मुंबईतून पॅरीसला जाणार्‍या माणसाला ’खिसापाकीट जपून बरं का, चोर फार तिकडे!’…

  • · ब्लॉग
    शहरनोंदी · ३

    शहरनोंदी ०३

    शहराचं शहरपण कशात असतं? एकच एक उत्तर देणं कठीण आहे. पण आपण हिशेब मांडून बघू. सर्वप्रथम प्रगत वैद्यकीय सुविधा. सुसज्ज रुग्णालयं आणि निष्णात डॉक्टर्स मोठ्या शहरांमध्ये सहजी उपलब्ध होतात, हे खरंच. तेच उच्चशिक्षणाच्या पर्यायांचं आणि वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांचं. बरोबरीनं जगभरातल्या…

  • · ब्लॉग
    शहरनोंदी · २

    शहरनोंदी ०२

    शहरं म्हणे बकाल असतात. तसं ते खरंही आहे. पण बकाल असतात म्हणजे काय असतात? कचरा असतो, गर्दी असते, की वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण? हे सगळं असतंच. पण त्याशिवाय वर थोडंसं काहीतरी, शब्दांत पकडता न येणारंही असतं. नाही पटत? थांबा, पायरी-पायरीनं बघू. बकालीसाठी दळणवळणाची सेवा अत्यावश्यक.…

  • · ब्लॉग
    शहरनोंदी · १

    शहरनोंदी ०१

    शहरं मोहक असतात. अहं, तुम्हांला वाटतंय तसा हा शहर विरुद्ध गाव असा नेहमीचाच वादंग नाही. गावंही त्यांच्या स्वतःच्या पद्धतीनं लाघवी असतातच. पण शहरांमध्ये भूल घालण्याची, वेड लावण्याची, मोहात पाडण्याची कसलीशी अजब ताकद असते हेही खरं. हे आजचं नाही, युगानुयुगे मिरवत आली आहेत शहरं ही…