गर्दी ही तशी सब्जेक्टिव गोष्ट असते. बेल्जियममधून दिल्लीत प्रथमच उतरलेल्या माणसाला ’सगळा बेल्जियमच अवतरलाय की काय या विमानतळावर?’ असं वाटून भीती वाटू शकते, मग तो बेल्जियमच्या राजधानीत का राहणारा असेना. पण मुंबईतून पॅरीसला जाणार्या माणसाला ’खिसापाकीट जपून बरं का, चोर फार तिकडे!’ हा इशारा अगदीच बाळबोध आणि बावळट वाटतो, कारण त्याला रोजच ’जिंकू किंवा मरू’ म्हणत पाठपिशवी पोटावर बांधून लढायला निघायची सवय असते. पण दुसर्या महायुद्धापूर्वी मुंबईत राहिलेल्या माणसाला आज सकाळी डोंबिवली स्टेशनवर सोडा; त्याला बहुतेक नुसती गर्दी बघूनच फेफरं येईल.
शहरनोंदी ०४
गर्दी ही तशी सब्जेक्टिव गोष्ट असते. बेल्जियममधून दिल्लीत प्रथमच उतरलेल्या माणसाला ’सगळा बेल्जियमच अवतरलाय की काय या विमानतळावर?’ असं वाटून भीती वाटू शकते, मग तो बेल्जियमच्या राजधानीत का राहणारा असेना. पण मुंबईतून पॅरीसला जाणार्या माणसाला ’खिसापाकीट जपून बरं का, चोर फार तिकडे!’…
१६ एप्रिल, २०२६
मेघना भुस्कुटे
शहर
मूळ Blogspot पृष्ठ: meghanabhuskute.blogspot.com/2026/04/blog-post_90.html