मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

टॅग

सिनेमा

२६ नोंदी

  • · ब्लॉग
    बुजरी गाणी · ११

    बुजरी गाणी ११

    हे गाणं आपल्या नॉस्टाल्जियाचा भाग असल्यामुळेच आपल्याला आवडत असणार, एरवी यात काय आहे, अशी मी स्वतःची समजूत काढत असे. कारण पडद्यावर चित्ते, वाघ, झेब्रे इत्यादींची आठवण करून देणारी टाइट्समधली शिल्पा शेट्टी आणि केसाळ छाती दाखवणारा अक्षयकुमार. त्यांच्या नाचाच्या मुद्रांचा - खरं तर…

  • · ब्लॉग

    थँक्स टू हिंदी सिनेमे ०४

    लग्नामधली गाणी हा बॉलिवुडमधला एक हुकमी एक्का. भरपूर गजरे ल्यायलेल्या, दागदागिन्यांनी मढलेल्या, खिदळणार्‍या, लाजणार्‍या , हसणार्‍या–हसवणार्‍या खूप बायका, खूप रंग आणि रोषणाई वापरून केलेल्या सजावटी, आणि सनईचे सूर. ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’मधल्या ‘तेरी कुडमायी के दिन आ गये’…

  • · ब्लॉग
    मराठी नट्या · ३

    मराठी नट्या ०३

    सगळ्यांत पहिल्यांदा तिला कधी पाहिलं हे आता मला नीटसं आठवत नाही. अर्थात, मुक्ताला ही दाद वाटणं शक्य नाही. तिला बघावं आणि ती लक्ष्यात राहू नये, अशी तिच्या अभिनयाची शैलीच नाही. चार्म्स आणि हेक्सेस आणि स्पेल्सची आतिषबाजी करत एखाद्या जादुगारणीनं एखाद्या द्वंद्वात एंट्री घ्यावी, तशी…

  • · ब्लॉग
    मराठी नट्या · २

    मराठी नट्या ०२

    आपण दुसऱ्या कुणाला दमदाटी करताना वरच्या दाताखाली खालचा ओठ आवळतो आणि डोकं खाली झुकवतो झटक्यानं, तसं करणारा एक टारगट दादागिरी-भाव रसिकाच्या चेहऱ्यात लपलेला आहे, असा कायम भास होई मला. बघता बघता ती 'क्या बे?' असं म्हणून टगेगिरी करायला लागेल, असं वाटायला लावणारा. मी तिची जी-जी कामं…

  • · ब्लॉग
    मराठी नट्या · १

    मराठी नट्या ०१

    नटांच्या अभिनयाबद्दल भरभरून लिहितात, तसं नट्यांच्या बाबतीत होत नाही. नटी म्हटलं की मधुबाला-टाईपचं सौंदर्य आठवण्याची प्रथा आहे. पण मराठीत कसली एकाचढ एक नट्यांची परंपरा आहे! नि रूढ सौंदर्यबिंदर्य राहिलं बाजूला – बघणार्‍या माणसावर फुंकर टाकून मंतरून टाकणारा अभिनय नि वावर नि…

  • · ब्लॉग
    बुजरी गाणी · १०

    बुजरी गाणी १०

    कसल्यातरी आघातानं एकाएकी मोठं होऊन बसावं लागलेल्या लोकांचं वाढलेलं वय निराळं कळतं. त्या वाढलेल्या वयात राठपणा असतो, पण त्यासोबत येणारी सुंदर नैसर्गिक प्रगल्भता नसते. नुसताच जगाला फसवू शकणारा मुखवटा असतो. काही कारणानं त्याला तडा गेला, की वाढता वाढता थबकून राहिलेलं कोवळं मूल…

  • · ब्लॉग
    बुजरी गाणी · ९

    बुजरी गाणी ०९

    हे गाणं सगळ्यांत आधी मुंबईतल्या पावसाचं आहे. मग त्यातल्या प्रेमिकांचं. भेटायचं ठरलंय. सगळीभर उत्कंठा, हुरहुर, अधीरता भरून राहिल्यासारखी. आणि पाऊस. आणि आधी पिवळ्याधम्मक फ्रॉकमधली नि मग जांभळ्या-पांढऱ्या कुर्त्यातली सोनाली बेंद्रे. आणि तसाच लालबुंद शर्टातला अक्षय खन्ना. दोघेही…

  • · ब्लॉग
    बुजरी गाणी · ८

    बुजरी गाणी ०८

    हे गाणं दिसायला चार गाण्यांहून वेगळं नाही. प्रियकर आणि प्रेयसी. फुलं. बागा. आवेग. पडद्यावर न दाखवता सुचवलेली चुंबनं. प्रणयाची पहिली रात्र. इत्यादी. पण तरीही ते डोक्यात रुतून का बसलं आहे, याचा विचार केला तर सगळ्यांत आधी आशाचं नाव समोर आलं. ऐंशी सालातला हा सिनेमा. त्या दशकात…

  • · ब्लॉग

    थॅंक्स टू हिंदी सिनेमे २

    कोकणातले दशावताराचे खेळ आता पूर्वीसारखे का रंगत नाहीत, याचं एक विलक्षण कारण इंद्रजीत खांबेंकडून ऐकायला मिळालं होतं. पूर्वी कंदील-पेट्रोमॅक्स आणि दिवट्या यांच्या प्रकाशात हे खेळ चालत. त्या दिव्यांचा सोनेरी पिवळसर अर्धधूसर प्रकाश जिथवर पोचेल तितकं त्याचं व्यासपीठ. हलत्या…

  • · ब्लॉग
    बुजरी गाणी · ७

    बुजरी गाणी ०७

    काही गाणी किंचित बुजरी असतात. भेंड्या खेळताना म्हणा, टीव्हीवर सतत वाजणार्‍या हिट गाण्यांच्या कार्यक्रमात म्हणा, लोकप्रिय कलावंतांच्या सर्वोत्तम गाण्यांच्या याद्यांत म्हणा.. ती सहसा दिसत नाहीत. त्यांच्यात काहीतरी असं असतं, ज्यामुळे ती कधीच हमरस्त्यावर येत नाहीत. गजबजलेल्या…