नटांच्या अभिनयाबद्दल भरभरून लिहितात, तसं नट्यांच्या बाबतीत होत नाही. नटी म्हटलं की मधुबाला-टाईपचं सौंदर्य आठवण्याची प्रथा आहे. पण मराठीत कसली एकाचढ एक नट्यांची परंपरा आहे! नि रूढ सौंदर्यबिंदर्य राहिलं बाजूला – बघणार्या माणसावर फुंकर टाकून मंतरून टाकणारा अभिनय नि वावर नि व्यक्तिमत्त्व असलेल्या नट्या. रेंज आणि इंटेन्सिटी आणि सूक्ष्मातिसूक्ष्म भाव दाखवण्याची क्षमता वागवणार्या. शबाना आझमी ‘Why actress? I am an actor.’ म्हणते तसं त्यांना नट्या न म्हणता कलाकार म्हणावं नि लिंगभेदासह येणारी कमनीय सौंदर्याची अपेक्षा साफ पुसून टाकावी, असा मोह होतो.
मराठी नट्या ०१
नटांच्या अभिनयाबद्दल भरभरून लिहितात, तसं नट्यांच्या बाबतीत होत नाही. नटी म्हटलं की मधुबाला-टाईपचं सौंदर्य आठवण्याची प्रथा आहे. पण मराठीत कसली एकाचढ एक नट्यांची परंपरा आहे! नि रूढ सौंदर्यबिंदर्य राहिलं बाजूला – बघणार्या माणसावर फुंकर टाकून मंतरून टाकणारा अभिनय नि वावर नि…
६ सप्टेंबर, २०२३
मेघना भुस्कुटे
सिनेमा
मूळ Blogspot पृष्ठ: meghanabhuskute.blogspot.com/2023/09/blog-post_60.html