मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

श्रेणी

काहीबाही

७६ नोंदी

  • · ब्लॉग

    निरर्थक

    कधी कधी असं वाटतं, की सगळ्याच गोष्टींची पुनरावृत्ती होते आहे. हातातून वाळू निसटत जावी, तशी आपली माणसं आपल्या आयुष्यातून निसटून जाताहेत. आणि आपण हताशपणे निव्वळ उभे आहोत. हा असा भूतकाळाशी सतत तुलना करण्याचा चाळा निरर्थक आणि काही अंशी मनोरुग्णतेचं द्योतकच, हे मान्य आहे. तरीही…

  • · ब्लॉग

    ...

    दर दिवशी नवी निवड. नवीन पर्याय. नवीन प्रश्न. त्यांतून रोज नवे होत गेलेले आपण. आणि रोज बदलत जाणार्‍या आपल्या नोंदी ठेवणारेही आपण. काय दिसतं त्यातून? वर-खाली, मागे-पुढे, ठळक-पुसट, नव्या-जुन्या, जोरकस-नाजूक रेषांच्या खुणा. दर दिवशी नवीन चित्र? आणि मग? बदलत गेलेले आणि तरीही पुन्हा…

  • · ब्लॉग

    इन्सेक्युअर्ड

    खूप जिवाजवळच्या माणसांबद्दल आपण मोकळेपणानं आणि तटस्थपणे बोलूच शकत नाही, तसंच काहीसं पुस्तकांबद्दल वाटायचं . अजूनही वाटतं. पण आपल्यातले काही भाग आपल्यातून सोडवून हे असे तळहातावर निरखायला घेतले, म्हणजे मग त्यांच्या निराळ्याच बाजू दिसायला लागतात. आपल्याही. \--- तर पुस्तकं. मला काय…

  • · ब्लॉग

    मॉर्निंग, वॉक आणि मी

    शुक्रवार रात्री नऊसाडेनऊ: उद्या (तरी) सकाळी उठून फिरायला जायचंच, मी कितव्यांदातरी निग्रहानं स्वत:शी घोकते. नेहमीप्रमाणे साडेपाच वगैरे वाजताचा अघोरी गजर लावते. मग एकदम पापमुक्त झाल्यासारखं वाटून लोळत टीव्ही. मग काही वेळ कादंबरी. झोप येण्यापुरती हातात धरलेलं अभ्यासाचं पुस्तक.…

  • · ब्लॉग

    लिहिण्याची सवयच गेलीय

    लिहिण्याची सवयच गेलीय. विश्राम बेडेकरांनी म्हटलं आहे, त्या चालीवर आपण लिहिल्याशिवाय जगू शकतो म्हणजे आपण लेखक नाही. मग हा अट्टाहास कशासाठी? उगाच खुजली म्हणून. पांढर्‍यावर आपल्या नावानं काळं झालेलं दिसलं की गारगार, एकदम सत्ताधीश वाटतं म्हणून. कुणी कुणी 'वा, छान' म्हणतं म्हणून.…

  • · ब्लॉग

    नाना परीच्या निकडी । खेळ मांडियेला ॥

    ही जी चिडचिड होते, ती कशामुळे होते? एक मिनिट. या सगळ्या प्रकारात आत्मसमर्थन का काय ते होणार. पण शक्यतोवर ते टाळून थोडं लांब जाऊन पाहायचा प्रयत्न आहे. शक्य तितका प्रामाणिक. तर, ही जी चिडचिड होते, ती कशामुळे होते? आपल्याला हव्या तशा गोष्टी आजूबाजूला नसल्या की चिडचिड होते. हव्या…

  • · ब्लॉग

    आम्ही लटिके ना बोलू...

    एखादा देणेकरी सतत आसपास दिसत राहावा तसंच हे. गप्प, घुमा, निर्विकार चेहर्‍याचा, चिवट देणेकरी. त्याला नजरेसमोरून वारता वारता आपण थकत जातो, पण तो थकत नाही. कुठल्याही जिवंत अनुभवाच्या परीघात हक्कानं येत राहतो तो. निर्लज्जपणाचा आव आणत आपण अधिकाधिक अस्वस्थ. चंदन-आंघोळीच्या ताज्या…

  • · ब्लॉग

    हू दी हेल केअर्स?

    फाटक्या कानातून वाहणारं उष्ण रक्त. त्यातून उद्दाम प्रदीर्घ विस्तारत गेलेली सूर्यफुलांची शेतं. इतकंच फक्त. \ \ \ हॅरीचा हातात आलेला सातवा भाग. सात हॉरक्रक्सेस. एक-दोन-तीन-चार-पाच-सहा-सात. हॅरीच्या डोक्यात अनाहत घुमणारं चक्र. मरायचं किंवा मारायचं या निवडीतली अपरिहार्यता कळल्यावर…

  • · ब्लॉग

    इक कविता का वादा है, मिलेगी मुझको..

    आतड्याची माणसं आपलं मरण स्वीकारत नाहीत तोवर म्हणे आपण मेलेले नसतोच. शरीर संपून त्याची राख वा माती होतही असेल कदाचित. पण अस्तित्व मात्र उरतं. अस्तित्व उरतं म्हणजे काय? आपण उरतो? आपण म्हणजे जर हे शरीर, हाडकं, रक्त-मांस नसूच - तर आपण काय असतो? आपल्या माणसांच्या ऊष्ण आठवणी? आपण…

  • · ब्लॉग

    वक्त जाता सुनाई देता है...

    कंटाळा. जडशीळ. सुस्त. निर्लज्ज बधिर कंटाळा. बघावं- तिकडे पसरलाय. व्यायाम? हो, केला की. आरोग्यपूर्ण खाणंपिणं? हो तर. सलाड, पालेभाज्या आणि मोड आलेल्या कडधान्यापर्यंत. फोनवरच्या निरुद्देश गप्पा? एकदम बंद. कामाखेरीज एरवी फोन बंद म्हटलं ना. चांगलं वाचत जावं मग. अर्थात. स्फूर्तिदायक…