मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

श्रेणी

पुस्तक

३० नोंदी

  • · ब्लॉग

    पुस्तके साठत जातात : १

    'पुस्तके साठत जातात' नावाची काळसेकरांची एक कविता आहे. तशी साठत गेली आहेत पुस्तकं. पुस्तकांच्या गठ्ठ्यातले कणे बघून एका नजरेत हवं ते पुस्तक बाहेर काढणाऱ्या मला एका पुस्तकासाठी ही उलथापालथ करावी लागली, तेव्हा एक नवाच किडा चावला. लहानपणी अधाश्यानं चवढव न बघता टोपलीभर अन्न चुटकीसरशी…

  • · ब्लॉग

    चालती-बोलती गर्भाशयं

    ‘द हॅंडमेड्स टेल’ या कादंबरीबद्दल गेल्या काही वर्षांत खूप लिहिलं-बोललं गेलं आहे. १९८५ साली कॅनडाच्या मार्गारेट अ‍ॅटवुड या लेखिकेनं लिहिलेली ही डिस्टोपियन कादंबरी गाजली, लोकप्रिय झाली, तिला अनेक पुरस्कार मिळाले. श्राव्य आणि दृश्य माध्यमांतून तिची रूपांतरणं सादर करण्यात आली.…

  • · ब्लॉग

    पुनर्वाचनायच

    अनेकदा पुस्तक वाचायला घेताना आपल्या डोक्यात काहीही उदात्त हेतू नसतो. ज्ञानसंपादन, चिंतन, वैचारिक देवाणघेवाण, कुतूहलशमन, बुद्धीकंडशमन... काहीही नाही. काहीतरी चटकदार, रसाळ, उत्कंठावर्धक वाचून वेळ मस्त घालवणे - बस. या वाचनाकडून इतर काही मिळत नाही, असं नव्हे. अर्थात, मिळतंच. पण…

  • · ब्लॉग
    लायब्र्यांचे दिवस · १

    लायब्र्यांचे दिवस १

    लहानपणी अनुभवलेल्या अनेक जागा आपल्या तत्कालीन आकाराशी इमान राखून असल्यामुळे आपल्याला मोठ्या भासलेल्या असतात. पण मोठेपणी तिथे गेलं, की ‘इतकुशीच होती ही जागा?’ असा विश्वासघात होऊन खट्टू व्हायला होतं. माझ्या पहिल्या लायब्रीच्या बाबतीत तसं होण्याची वेळ सुदैवानं कधीच आली नाही. मी…

  • · ब्लॉग
    इतक्यात वाचलेली पुस्तकं · ४

    इतक्यात वाचलेली पुस्तकं

    श्री. बा. जोशींच्या 'उत्तम मध्यम'ला विषय असा नाही. कधी कुणा गुजराती संताचा परिचय करून देतील, कधी बिहारात आपलं मराठीपण खडीसाखरेसारखं विरघळवून टाकणाऱ्या कुणा उपेक्षित विद्वानाबद्दल सांगतील. कधी टागोरांनी गौरवलेल्या मराठी शिल्पकाराच्या शिल्पाचं कौतुक रचतील; कधी लंडन लायब्ररीसारख्या…

  • · ब्लॉग
    इतक्यात वाचलेली पुस्तकं · ३

    इतक्यात वाचलेली पुस्तकं

    One foot on the ground: A life told through the body Shanta Gokhale Speaking Tiger Publication जेव्हा एखादा लेखक शरीराबद्दल बोलतो, तेव्हा तो ओशाळतोय का, त्याला पोटातून गुदगुल्या झाल्यासारखा आनंद होतोय का, तो उत्तेजित होतोय का, तो मूर्तिभंजन करू इच्छितो आहे का, किती जोरानं आणि…

  • · ब्लॉग

    पुस्तकी नॉस्टाल्जियाचे कढ

    (चित्रश्रेय : नीतीन वैद्य) \ \ जादूची अंगठी, रक्तपिपासूंची दरी, सोनेरी पेला, बारा राजपुत्र आणि इतर कथा, दुष्ट जादूगार आणि बोलणारा पोपट, उडता गालिचा, गाणारे झाड... असल्या नावांची चार-चार आण्यांना मिळणारी पुस्तकं आमच्या लहानपणी असत. 'गोष्टींची पुस्तकं' या एका लेबलाखाली मावतील, अशी…

  • · ब्लॉग

    अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

    अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट आनंद विंगकर, लोकवाङ्मय गृह प्रकाशन या गोष्टीची कोरड्या सुरात समीक्षकी चीरफाड करायला मला लगेच जमणार नाही. घुटक्याघुटक्यात, कोरडेपणी, एका हातानं व्हॉट्सअ‍ॅप वा फेसबुक चाळत करण्याच्या, चैनीच्या वाचनाला विटून तिला हात घातला होता. तिनं पुरेपूर दान…

  • · ब्लॉग

    21 Lessons for the 21st Century

    21 Lessons for the 21st Century \- Yuval Noah Harari हे या पुस्तकाचं परीक्षण नाही, परिचयही नाहीच. पुस्तक वाचताना-वाचून डोक्यात आलेल्या गोष्टी एका ठिकाणी नोंदवणं आहे फक्त. मुळात पुस्तकाचा विषयच इतका डेंजर असताना, आपण त्याबद्दल काय बरंवाईट बोलणार, असा एक किंचिद्गंड मला आहेच. पण…

  • · ब्लॉग

    पुस्तक एक, पुस्तकं अनेक

    कोणतंही पुस्तक वाचताना आपण फक्त तेवढं एकच पुस्तक वाचत नसतो. त्या-त्या जातकुळीची आणि पूर्णतः निराळी, वाचलेली आणि न वाचलेली पुस्तकं आणि लेख आणि स्फुटं आणि चर्चाधागे आठवत राहतात. त्या सगळ्यांनी मिळून आपल्या डोक्यात तयार केलेल्या जाळ्यात हेही पुस्तक जाऊन बसतं. क्वचित काही न…