अनेकदा पुस्तक वाचायला घेताना आपल्या डोक्यात काहीही उदात्त हेतू नसतो. ज्ञानसंपादन, चिंतन, वैचारिक देवाणघेवाण, कुतूहलशमन, बुद्धीकंडशमन… काहीही नाही. काहीतरी चटकदार, रसाळ, उत्कंठावर्धक वाचून वेळ मस्त घालवणे - बस. या वाचनाकडून इतर काही मिळत नाही, असं नव्हे. अर्थात, मिळतंच. पण वाचताना निदान माझा तो मुख्य उद्देश असत नाही. या क्याटेगरीतलीच पुस्तकं पुन्हा-पुन्हा, पुन्हा पुन्हा वाचली जातात. अशा पुस्तकांपैकी निवडक सात पुस्तकं.
~~
पुस्तक पहिले

एक होती आजी : श्री. ना. पेंडसे