मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

टॅग

पुस्तक

३० नोंदी

  • · ब्लॉग

    दिसामाजी काहीतरी : अंतर्जनम : देवकी निलयगोडे

    ‘अंतर्जनम’ हे देवकी निलयमगोडे (उच्चारात चू०भू०दे०घे०) यांचं आत्मचरित्र. नंबुद्री ब्राह्मण घरात १९२८ साली जन्माला आलेल्या या बाई. इंदिरा मेनन आणि राधिका पी. मेनन अशा दोघी जणींनी देवकीबाईंची मल्याळमध्ये लिहिलेली दोन चरित्रात्मक पुस्तकं आणि त्यांचेच काही सुटे लेख यांचं इंग्रजीत…

  • · ब्लॉग

    द प्यूमा इयर्स

    खूप दिवसांपासून मांजर पाळायचं होतं. अंगभूत डौल, शिकारी प्राण्याचे गुण. चकित करणारी चपळाई, सावध चाल, तीक्ष्ण नजर, अफाट श्रवणक्षमता, डोक्याएवढ्या लहान सापटीतून सहजी निसटू शकणारं शरीर, धारदार नख्या आणि दात... असं सगळं असलेलं मांजर पाळीव असलं, तरी मिजास राखून असतं. ती त्याची…

  • · ब्लॉग

    चाळीस वर्षं ओलांडून आलेली मैत्रीण

    एकेरीत उल्लेख करायला पद्मजा फाटक मला समवयस्क नव्हे. सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर वगैरे लोकांसारखी आपोआप एकेरीतली जवळीक प्राप्त होण्याइतकी सुप्रसिद्ध आणि थोर कलावतीही नव्हे. पण तरीही तिच्याशी झालेल्या पहिल्याच पुस्तकभेटीनंतर तिच्याविषयी ‘आदरणीय लेखिका पद्मजा फाटक’ या जातीचं काही…

  • · ब्लॉग
    इतक्यात वाचलेली पुस्तकं · ८

    इतक्यात वाचलेली पुस्तकं : अर्ली इंडियन्स

    सुमारे पासष्ट हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून निघालेली काही आदिमाणसं भारतीय उपखंडात आली. काही युरोपात गेली. पण ‘अर्ली इंडियन्स’ हे टोनी जोसेफ लिखित पुस्तक इतरत्र गेलेल्या माणसांकडे फार निरखून बघत नाही. त्याचा रोख आहे तो भारतीय उपखंडातल्या माणसांच्या इतिहासाकडे. ही आदिमाणसं भारतीय…

  • · ब्लॉग
    इतक्यात वाचलेली पुस्तकं · ७

    इतक्यात वाचलेली पुस्तकं : एका श्वासाचं अंतर

    अंबिका सरकारांबद्दल निरनिराळ्या गोष्टी ऐकल्या होत्या. पोटच्या तिन्ही मुलांचा मृत्यू पाहावा लागणं. अर्थशास्त्राचं अध्यापन. सळसळता उत्साह. गौरी देशपांडेशी असलेली मैत्री आणि तिच्या तोंडचं ‘माझी अंबू’ हे संबोधन. ‘द रीडर’चं अंबिकाबाईंनी केलेलं भाषांतर. ते भाषांतर आणि सिनेमा या दोन…

  • · ब्लॉग
    इतक्यात वाचलेली पुस्तकं · ६

    इतक्यात वाचलेली पुस्तकं

    धारपांची इतर काही पुस्तकं मागे वाचली होती. समर्थ आणि आप्पा या जोडीचं मात्र काही वाचलं नव्हतं. रोहन प्रकाशनानं प्रसिद्ध केलेली समर्थ-पुस्तकमालिका वाचली. एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. धारपांच्या कथांची मुळं भारतीय मातीतली नाहीत, हे मूळ पुस्तकं वाचणार्‍याला कळतंच. पण मूळ पुस्तकंं…

  • · ब्लॉग
    इतक्यात वाचलेली पुस्तकं · ५

    इतक्यात वाचलेली पुस्तकं - निर्मला पाटील यांचे आत्मकथन

    मराठी – त्यातही लेखिकांच्या कादंबर्‍यांवर तुच्छतेच्या सुरात एक लेबल लावण्याची प्रथा आहे. ‘नातेसंबंधांवरच्या कादंबर्‍या’. चौकटीतून सुटू पाहणारी एक स्त्री आणि तिच्या चौकटीतून बाहेर पडण्याच्या प्रवासाची गोष्ट असं त्यांचं स्वरूप असतं. शांताबाईंची नवीन कादंबरी त्याच ट्रोपचा वापर करून…

  • · ब्लॉग

    दिसामाजी काहीतरी

    वाचनात आलेल्या पुस्तकांविषयीची ही टिपणं. फेसबुकावर विखरून जातात. म्हणून इथे एकत्रित टाचून ठेवत आहे. पिवळा पिवळा पाचोळा शहरी वाचकाला पूर्णतः अनभिज्ञ असलेलं, तसंच ग्रामीण साहित्याच्या घासून गुळगुळीत झालेल्या साच्यांपासून फटकून असलेलं हे जग. ठसठशीत रंगांनी रेखलेल्या त्यातल्या…

  • · ब्लॉग

    वाचकपण

    एखाद्या तालेवार दिवशी तुम्हांला लेखक सापडतो. मग तुम्ही त्याची इतर पुस्तकं उत्सुकतेनं शोधता. काही आवडतात. क्वचितच पहिल्या पुस्तकाइतकं काही आवडतं. तसं झालं, की समजावं, आता नीट मागे टेकून बसावं लागणार. लांब जायचंय. अनेकदा हे प्रवास नुसतेच दीर्घ नाही, कायमचेच ठरतात. आपल्या बशीतून…

  • · ब्लॉग

    पुस्तकं राहतात साठून

    निरर्थक सामान साचत जावं एखाद्या श्रीमंत होत गेलेल्या मूळच्या गरीब माणसाच्या घरात,

    तशी पुस्तकं राहतात साठून.

    कणाकणानं, क्षणाक्षणानं ससंदर्भत्वावर साचत राहते धूळ. चिऱ्याचिऱ्यानं ढासळत राहतात त्यांचे आयुष्याशी बांधलेले पूल.

    साठवणाऱ्यानं कधीमधी उघडून पाहिल्यावर

    स्मृतिभ्रंश झालेल्या माणसाला ऐकू यावी पूर्वायुष्यातली एखादी आर्त धून,

    …