मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

कोरा कागद निळी शाई!

१९ जुलै, २०१५ · अद्यतन १७ ऑक्टोबर, २०१५

हुंकारभुता बोल काही

अळीमिळी सोडून देई

इतके सारे बोललो तरी

घरभर उरून राही –

   कोरा कागद निळी शाई!

कागदाच्या चल होड्या करू

तो बघ झाला पाऊस सुरू

दिवस गेला लिखा-पढी

सोड की रे अढी-बिढी –

   चल आता मडके भरू!

“कसली अढी कसले काय,

फक्त थोडा रुसलो हाय!”

सगळा धडा पाठ आहे

मान माझी ताठ आहे –

   पण गाण्याचा शेवट नाय?

“ताठ मान हवी खरी

पण आता पुरे तिरीमिरी

म्हणतो राती परतीन घरी

मानगुटीवर बसलेय गाणे -

   गाण्याशिवाय भागणार नाय!"

तेच तर!

हुंकारभुता गाऊ काही

अळीमिळी सोडून देई

नको कागद नको शाई

कोरा कागद निळी शाई?

   नक्को कागद नक्को शाई!

मेघना भुस्कुटे

कविता

मूळ Blogspot पृष्ठ: meghanabhuskute.blogspot.com/2015/07/blog-post_19.html