मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

स्वप्नसर्प

७ मे, २०१४

जागांशी जडती नाती

नात्यांच्या दुखर्‍या जागा |

पावसात गुंतून राही

मायेचा अवघड धागा ||

माळावर सूर्य उद्याचे

दिवसाची देती ग्वाही |

रात्रींचा हुरहुरवारा

तरी जिवास वेढून राही ||

चढलासे बघ मज सखया

हा मोहफुलांचा अर्क |

देहात फुलांचे दंश

डसला स्वप्नांचा सर्प…

मेघना भुस्कुटे

कविता

मूळ Blogspot पृष्ठ: meghanabhuskute.blogspot.com/2014/05/blog-post.html