मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

पाणी

३१ डिसेंबर, २०१३ · अद्यतन ४ जानेवारी, २०१४

उसळता एकान्त येथे |

निरवतेचा बोल आहे |

आज इथले खोल पाणी |

वाट फोडत वाहताहे ||

रम्य तारे रम्य वारे |

पाखरे दवी न्हायलेली |

मात्र पाणी साहताहे |

रात्र काळी रात्र ओली ||

उजळलेले काठ काही |

नांदते घर वाट पाही |

चंद्र पोटी पोसणार्‍या |

पाण्यास त्याचा ठाव नाही ||

मेघना भुस्कुटे

कविता

मूळ Blogspot पृष्ठ: meghanabhuskute.blogspot.com/2013/12/blog-post_31.html